"First they ignore you, then they laugh at you, then they fight you, then you win." - Mahatma Gandhi"

Monday, October 18, 2010

चलता है........!!!!!



चलता है........!!!!!

वॉरन अ‍ॅंडरसन तुमच्या आमच्या नाकावर टिच्चून पळून गेला. त्याला त्यावेळच्या केंद्र आणि राज्य सरकारांनी पळून जाण्यास मदत केली. पोलीस ठाण्यातच त्याला जामीन दिला गेला. त्याने परत येईन म्हणून कबूल केले होते. पुन्हा काही त्याने तोंड दाखवले नाही. भोपाळ कांड घडल्यानंतर लवकरच खटल्याचा निकाल लागला. लवकरच? का नाही......२६ वर्षेच तर लागलीत. आरोपींना सजा झाली ना! माजी केंद्रीय मंत्री वसंत साठे आज बोलत आहेत. त्यावेळी त्यांची बोलती बंद होती. सत्तेसाठी केवढी लाचारी. सत्तेपासून दूर गेल्यावरच सत्य सांगायचे असते, नाही. असे आपले षंढ नेते आणि आपणही कुठले मर्द? अ‍ॅंडरसन पळून गेल्याचे शंभर कोटींच्या देशात कोणालाच कळले नाही, कोणीच त्याचेवर कारवाईसाठी पुढाकार घेतला नाही. नुकसान भरपाई महत्त्वाची होतीच पण् आरोपींना योग्य त्या कलमांखाली सजा होणेही कमी महत्त्वाचे नव्हते. हजारो लोक मेले आणि सजा फक्त दोन वर्षे! सर्वोच्च न्यायालयाने आरोप मवाळ केले होते म्हणतात. सरकारलाही दोषींना कडक सजा व्हावी अशी इच्छा नसावी. भोपाळ कांडाचे व्रण कुरवाळत बसायचे एवढेच आपल्या हातात आहे. जे जे होईल, ते ते पहावे, चित्ती असू द्यावे समाधान. चलता है.......



अ‍ॅंडरसन तर परदेशी आहे, पण आपले देशी आरोपीही काही कमी आहेत का? विनायक मेटे, राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष, नुकतेच निवडून आलेले विधान परिषदेचे आमदार. २००० साली परिवहन अधिकाऱ्याला मारल्याबद्दल त्यांचेवर बीडला फौजदारी खटला सुरू आहे. पकड् वॉरंट घेवून जावून त्यांना न्यायालयात हजर करण्याचे आदेश आहेत. आमच्या कर्तव्यदक्ष पोलिसांना ते सापडतच नाहीत. त्यांच्या लेखी फरार आहेत ते. याच मेटेंच्या सांगण्यावरून, चिथावण्यावरून ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर यांच्या निवासस्थानी हल्ला करण्यात आला होता. त्यांना पक्षाने निलंबित केले होते. विधानसभा निवडणुकीचे तोंडावर त्यांना पुन्हा पक्षाने सन्मानाने परत घेतले. तो त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे. आपल्याला काय करायचे आहे? चलता है.......


मिरज दंगल घडवणारा बागवान. पोलीस अधीक्षक कृष्णप्रकाश निरोप समारंभाचे वेळी बागवानबाबत वाच्यता करतात. दंगल घडून महिने उलटून जातात तरी आरोपी सापडत कसे नाहीत? दंगल शमली यातच आपल्याला समाधान वाटते. आरोपींना पकडले नाही, त्यांना सजा झाली नाही तरी आपल्याला काही फरक पडत नाही तो सरकारचा आणि त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे. आपल्याला काय करायचे आहे? चलता है.........

अफजलखानाच्या वंशजांच्या भावना दुखावतील म्हणून शिवाजीने त्याचा कोथळा बाहेर काढलेला दाखवणारे पोस्टर लावण्यास मनाई केली तर आपण निमूटपणे मान्य करायची. कायद्याचे आणि नियमाचे पालन करणे, हे आपले कर्तव्य् नाही का? कोणाच्या भावना दुखावण्याचा आपल्याला काय अधिकार? शिवाजींनी त्याला उगीचच मारले. केवढा त्रास् झाला असेल त्याला? नशीब त्यावेळी शिवाजीच्या बाजूला गांधी-पवार-देशमुख-कदम-चव्हाण नव्हते, नाहीतर त्यांनी शिवाजीला पटवून अफजलखानाला सोडायला लावले असते आणि आज आपण नमाज पढताना दिसलो असतो. अफजलखानाच्या नावाने महाराष्ट्र सरकारच्या सांस्कृतिक खात्याने एखादा पुरस्कार जाहीर केला तर वाईट वाटून घेवू नका, नाही तरी दादोजी कोंडदेव पुरस्कार रद्द केला तरी आपण काही केले का? नाही ना. आपल्याला काय करायचे आहे, तो सरकारचा अंतर्गत प्रश्न आहे. चलता है.........


संसद हल्ल्यावरील आरोपी अफजल गुरूला फाशीची सजा ठोठावण्यात आली. अजून अंमलबजावणीची तारीख ठरली नाही. त्याच्यासाठी आणलेला फाशीचा दोर उंदरांनी कुरतडून टाकला. तारीख ठरल्यावरही नवीन दोर आणण्यासाठी आणि जल्लादाला देण्यासाठी पैसे नाहीत म्हणून फाशी लांबू शकते. दया याचनेची फाईल राष्ट्रपतीकडून् गृहमंत्र्याकडे, तिथून दिल्ली सरकारकडे आणि तिथून परत् जायला अजून काही वर्षे लागू शकतात. विशिष्ट कालावधीतच दया अर्जावर निकाल द्यायला पाहिजे असे काही बंधन नाही. आम्ही कायद्याचे पालन करतो आहे. कायद्याचे पालन मतलबाचे वेळी करणे आणि मतलबाचे वेळी कायदा तोडताड करून कचरापेटीत टाकण्यात आपल्याइतका कुठल्याच देशातला नागरिक तरबेज नाही. संसद हल्ला निष्फळ केला ना आपण? त्यावेळच्या शहीद जवांनाना मेडल्स दिले ना, त्यांच्या कुटुंबीयांना नोकऱ्या, पेट्रोलपंप दिले ना, आता अफजलला फाशी द्यायची काय घाई आहे? तो सरकारचा अंतर्गत प्रश्न आहे. त्याला फाशी दिल्याने भाज्यांचे भाव कमी होणार आहेत का? अफजल हा आपल्यासाठी महत्त्वाचा विषय नाही. अजून् खूप् अतिरेकी हल्ले होऊ द्या. खूप् शिकायला मिळतं त्यातून. लोकांना खायला मिळाले नाही तरी चालेल, संरक्षणावर खूप खर्च करणे आवश्यक आहे. संरक्षण नाही झाले तरी चालेल. चलता है........



आपण सर्वांनी मिळून या "भारत" नावाच्या देशाचा नुसता "फलुदा" करून ठेवलेला आहे. आधी मोगलांच्या लाथा खाल्ल्या, नंतर इंग्रजांच्या, आता तर स्वकियच आपल्याला तुडवताहेत. पण परक्यांपेक्षा आपले बरे. चलता है............

No comments:

Post a Comment