"First they ignore you, then they laugh at you, then they fight you, then you win." - Mahatma Gandhi"

Monday, October 18, 2010

चलता है........!!!!!



चलता है........!!!!!

वॉरन अ‍ॅंडरसन तुमच्या आमच्या नाकावर टिच्चून पळून गेला. त्याला त्यावेळच्या केंद्र आणि राज्य सरकारांनी पळून जाण्यास मदत केली. पोलीस ठाण्यातच त्याला जामीन दिला गेला. त्याने परत येईन म्हणून कबूल केले होते. पुन्हा काही त्याने तोंड दाखवले नाही. भोपाळ कांड घडल्यानंतर लवकरच खटल्याचा निकाल लागला. लवकरच? का नाही......२६ वर्षेच तर लागलीत. आरोपींना सजा झाली ना! माजी केंद्रीय मंत्री वसंत साठे आज बोलत आहेत. त्यावेळी त्यांची बोलती बंद होती. सत्तेसाठी केवढी लाचारी. सत्तेपासून दूर गेल्यावरच सत्य सांगायचे असते, नाही. असे आपले षंढ नेते आणि आपणही कुठले मर्द? अ‍ॅंडरसन पळून गेल्याचे शंभर कोटींच्या देशात कोणालाच कळले नाही, कोणीच त्याचेवर कारवाईसाठी पुढाकार घेतला नाही. नुकसान भरपाई महत्त्वाची होतीच पण् आरोपींना योग्य त्या कलमांखाली सजा होणेही कमी महत्त्वाचे नव्हते. हजारो लोक मेले आणि सजा फक्त दोन वर्षे! सर्वोच्च न्यायालयाने आरोप मवाळ केले होते म्हणतात. सरकारलाही दोषींना कडक सजा व्हावी अशी इच्छा नसावी. भोपाळ कांडाचे व्रण कुरवाळत बसायचे एवढेच आपल्या हातात आहे. जे जे होईल, ते ते पहावे, चित्ती असू द्यावे समाधान. चलता है.......



अ‍ॅंडरसन तर परदेशी आहे, पण आपले देशी आरोपीही काही कमी आहेत का? विनायक मेटे, राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष, नुकतेच निवडून आलेले विधान परिषदेचे आमदार. २००० साली परिवहन अधिकाऱ्याला मारल्याबद्दल त्यांचेवर बीडला फौजदारी खटला सुरू आहे. पकड् वॉरंट घेवून जावून त्यांना न्यायालयात हजर करण्याचे आदेश आहेत. आमच्या कर्तव्यदक्ष पोलिसांना ते सापडतच नाहीत. त्यांच्या लेखी फरार आहेत ते. याच मेटेंच्या सांगण्यावरून, चिथावण्यावरून ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर यांच्या निवासस्थानी हल्ला करण्यात आला होता. त्यांना पक्षाने निलंबित केले होते. विधानसभा निवडणुकीचे तोंडावर त्यांना पुन्हा पक्षाने सन्मानाने परत घेतले. तो त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे. आपल्याला काय करायचे आहे? चलता है.......


मिरज दंगल घडवणारा बागवान. पोलीस अधीक्षक कृष्णप्रकाश निरोप समारंभाचे वेळी बागवानबाबत वाच्यता करतात. दंगल घडून महिने उलटून जातात तरी आरोपी सापडत कसे नाहीत? दंगल शमली यातच आपल्याला समाधान वाटते. आरोपींना पकडले नाही, त्यांना सजा झाली नाही तरी आपल्याला काही फरक पडत नाही तो सरकारचा आणि त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे. आपल्याला काय करायचे आहे? चलता है.........

अफजलखानाच्या वंशजांच्या भावना दुखावतील म्हणून शिवाजीने त्याचा कोथळा बाहेर काढलेला दाखवणारे पोस्टर लावण्यास मनाई केली तर आपण निमूटपणे मान्य करायची. कायद्याचे आणि नियमाचे पालन करणे, हे आपले कर्तव्य् नाही का? कोणाच्या भावना दुखावण्याचा आपल्याला काय अधिकार? शिवाजींनी त्याला उगीचच मारले. केवढा त्रास् झाला असेल त्याला? नशीब त्यावेळी शिवाजीच्या बाजूला गांधी-पवार-देशमुख-कदम-चव्हाण नव्हते, नाहीतर त्यांनी शिवाजीला पटवून अफजलखानाला सोडायला लावले असते आणि आज आपण नमाज पढताना दिसलो असतो. अफजलखानाच्या नावाने महाराष्ट्र सरकारच्या सांस्कृतिक खात्याने एखादा पुरस्कार जाहीर केला तर वाईट वाटून घेवू नका, नाही तरी दादोजी कोंडदेव पुरस्कार रद्द केला तरी आपण काही केले का? नाही ना. आपल्याला काय करायचे आहे, तो सरकारचा अंतर्गत प्रश्न आहे. चलता है.........


संसद हल्ल्यावरील आरोपी अफजल गुरूला फाशीची सजा ठोठावण्यात आली. अजून अंमलबजावणीची तारीख ठरली नाही. त्याच्यासाठी आणलेला फाशीचा दोर उंदरांनी कुरतडून टाकला. तारीख ठरल्यावरही नवीन दोर आणण्यासाठी आणि जल्लादाला देण्यासाठी पैसे नाहीत म्हणून फाशी लांबू शकते. दया याचनेची फाईल राष्ट्रपतीकडून् गृहमंत्र्याकडे, तिथून दिल्ली सरकारकडे आणि तिथून परत् जायला अजून काही वर्षे लागू शकतात. विशिष्ट कालावधीतच दया अर्जावर निकाल द्यायला पाहिजे असे काही बंधन नाही. आम्ही कायद्याचे पालन करतो आहे. कायद्याचे पालन मतलबाचे वेळी करणे आणि मतलबाचे वेळी कायदा तोडताड करून कचरापेटीत टाकण्यात आपल्याइतका कुठल्याच देशातला नागरिक तरबेज नाही. संसद हल्ला निष्फळ केला ना आपण? त्यावेळच्या शहीद जवांनाना मेडल्स दिले ना, त्यांच्या कुटुंबीयांना नोकऱ्या, पेट्रोलपंप दिले ना, आता अफजलला फाशी द्यायची काय घाई आहे? तो सरकारचा अंतर्गत प्रश्न आहे. त्याला फाशी दिल्याने भाज्यांचे भाव कमी होणार आहेत का? अफजल हा आपल्यासाठी महत्त्वाचा विषय नाही. अजून् खूप् अतिरेकी हल्ले होऊ द्या. खूप् शिकायला मिळतं त्यातून. लोकांना खायला मिळाले नाही तरी चालेल, संरक्षणावर खूप खर्च करणे आवश्यक आहे. संरक्षण नाही झाले तरी चालेल. चलता है........



आपण सर्वांनी मिळून या "भारत" नावाच्या देशाचा नुसता "फलुदा" करून ठेवलेला आहे. आधी मोगलांच्या लाथा खाल्ल्या, नंतर इंग्रजांच्या, आता तर स्वकियच आपल्याला तुडवताहेत. पण परक्यांपेक्षा आपले बरे. चलता है............

Tuesday, July 13, 2010

एक विचित्र अनुभव....................

भुत आहे का मला माहीत नाही................... पण जसा देव आहे असं मानतो तसं भूतही असेल असं मानतो.माझ्या सोबत असाच एक विचित्र
अनुभव घडला शेअर करतोय..........
आम्ही बीडला एका कार्यक्रमासाठी गेलो होतो.कार्यक्रम संपवून.......प्रत्येक जण आपआपल्या गाड्यांमध्ये बसणार तेवढ्यात खूप मोठा भयानक आवाज आला... काच फुटल्याचा, माणसाच्या ओरडण्याचा.... मागे वळून पाहिलं तर एका इंडिका गाडीला समोरून एका मोठ्या ट्रक ने धडक दिली होती... गाडीचे इंजिन व पुढचा सगळा भाग ड्रायव्हर बसलेला त्या जागेपर्यंत चेपला गेला.... आणि देव तारी त्याला कोण मारी... ह्या म्हणीला अनुसरून ड्रायव्हर ला किरकोळ जखमा झाल्या होत्या.... लोकांनी त्याला गाडीतून बाहेर काढले.... आणि पोलिसांना बोलावले... आयोजकांपैकी काहीजण आम्हाला म्हणत होते की तुम्ही सर्व निघा नाहीतर ट्रॅफिक जॅम झाले तर तुम्हाला खूप वेळ थांबावे लागेल... त्यांचे म्हणणे योग्य होते.... आणि आम्हाला सर्वांना औरंगाबादला पोहोचायचे असल्याने आम्हाला निघायचेच होते.... २ तासांचा प्रवास होता आम्ही लगेच निघालो...

हायवे ला लागलो तर समोर रस्त्यात एका ठिकाणी रक्त सांडले होते.... झाड पाला आणि काचांचेही तुकडे होते.... खुणांवरून असे वाटत होते की नुकताच अपघात झाला असावा... आमच्या ड्रायव्हर ने गाडी हळू करून जरा बाजूने घेतली... परंतु आम्ही तिथे थांबलो नाही... (बीड ते जामखेड भागात आदिवासी लोक अचानक मध्ये येऊन गाड्या थांबवतात आणि चाकू दाखवून लुटतात असे आम्ही ऐकून होतो )

पुढे आलो तर एक गाडी अचानक रस्त्यावरून उजवीकडे उतारावर माळरानात उतरताना दिसली आणि काही क्षणात करकचून ब्रेक दाबल्याने खूप धुरळा उडाला... आम्ही क्षणभर थांबलो.... न जाणो कुणाला आपल्या मदतीची गरज असेल... पण गाडीतून कोणीतरी उतरले.... सगळे सुखरूप आहेत असे पाहून आम्ही काही न बोलता पुढे निघालो.... कदाचित ड्रायव्हर चा क्षणभर डोळा लागला असेल आणि असे झाले असेल...

आम्हाला कळतच नव्हते की हे काय चालले आहे? इतके अपघात/अपघातासारखे प्रकार का घडत आहेत आज? की हे रोजच होतात आणि आपण पहिल्यांदाच पाहत आहोत म्हणून असे वाटत आहे?

ह्या विचारतच पहाटे ६ च्या सुमारास आम्ही औरंगाबादच्या जवळ पोहोचलो. आणि समोर.... अजून एक अपघात.... मोठ्या ट्रक मध्ये लोखंडी सळया ठेवलेल्या असतात ना.... यू शेप मध्ये ... आणि त्या यू ची दोन्ही टोके ट्रक बाहेर लोंबकळत असतात अश्या एका ट्रक ला एका दुसय्रा ट्रक ने ठोकले होते... आणि त्या सळयांमुळे दुसय्रा ट्रक ची काच फुटली होती.... आणि थोडे नुकसान झाले होते... ड्रायव्हर ला वगैरे लागले होते की नाही मला माहीत नाही... कारण पोलिस पोहोचलेले होते.... आता फक्त पोलिस आणि हे दोन ट्रक तिथे होते...

आता मात्र आम्ही अचंबित झालो होतो... की हे का होते आहे???? आणि आमच्या ड्रायव्हर पवन ने विषय छेडला....

काल बुद्धपौर्णिमा होती.... पौर्णिमा आणि अमावस्या ह्या दिवशी ग्रह, निसर्ग ह्यात अनेक बसल होतात आणि अपघात घडतात असे म्हटले जाते... हो हे मी सुद्धा ऐकले होते.... अमावस्येच्या दिवशी आईबाबा देखील प्रवास करायला नाही सांगतात... पण पौर्णिमेबद्दल इतका विचार कधी केला नव्हता.... ह्याच्याच अनुषंगाने मग आम्ही प्रत्येकाने भुताच्या गोष्टी सांगायला सुरुवात केली... आणि प्रत्येकालाच आपल्या ओळखीच्यांचे... नातेवाईकांचे... आणि एकाला स्वतः आलेले भुताचे अनुभव आठवले आणि ते आम्ही एकमेकांशी शेअर केले...

तुम्हाला काय वाटतं... ही अंधश्रद्धा आहे... असे अनेकांचे म्हणणे असेल... पण मी काही प्रमाणात ह्या गोष्टींवर विश्वास ठेवतो....माझ्या घरच्या वातावरणाचा परिणाम असेल कदाचित कारण दोघेही मला अजून दिसले नाहीत...

तुम्हाला कोणाला असे अनुभव आले आहेत का? जरुर शेअर करा............

Thursday, March 25, 2010

खरचं स्वभावाला औषध नसतं का?

आपल्या मराठीत एक म्हण आहे कि, "स्वभावाला औषध नसतं" म्हणजे आपण कितीही प्रयन्य केला तरी स्वभाव बदलू शकत नाही, याची प्रचिती आपल्याला स्व:त किवा मिंत्राच्या रुपात येत असते. माझाच उदाहरण घ्या ना राव, माझा स्वभाव तसा खोडकर, १०वी पर्यत एकही दीवस असा गेला नाही की,घरी माझ्यामुळे भाडणं आलं नाही, रोज कोणाच्या तरी घराच्यां काचा चेंडुने फ़ॊंडणार नाहीतर दूसरे काही, रॊजचा नियमचं बनला होता.
१०वी झाली,मस्त मार्काने पास झालो,आता कॉलेज म्हणजे आपल्याला सारं रान आपल्याला मोकळं असं मला वाटायचं ,मी औरंगाबादच्या शिंवछत्रपती महाविद्यालयात प्रवेश घेतला, मग काय रोज मित्राबरोबर "कॅनॉट प्लेसला" Party आठवड्याला पीव्हीआरला एक पींचर, आणि दर महिन्याला कॉलेजमध्ये भाडणं आणि ती principalची कॅबिन ठरलेलं वेळापत्रक, काय सांगू कीती मजा यायची राव, आजही ते दिवस मी मिस करतो . १२वी ला आलो घरच्यानां वाटलं आता पोरगं सुधरेलं पण कशाचे काय यावेळी तर , मी सिमांच ओलाडंली , Bioच्या सरांनाच direct धमकी दीली , नंतर मॅटर दाबण्याचा आम्ही खुप प्रयन्य केला पण काहीही उपयोग झाला नाही, परत principalची कॅबिन पण यावेळी principalने माझ्या वडलांना बोलावल,आणि माझं अ‍ॅडमिशन रद्द करन्यांची धमकी दीली .मला त्या principalचा रागचं आला पण काय करणार, मनात म्हणलं बाहेर ये मग सांगतो आणि मी राग आवरला,काय सागूं आतापर्यत वाटत होतं,"आपण मराठे म्हणजे दूसरे वाघचं आणि येथ..............सोडा कूठे शिव्या देता राव."
१२वीची exam झाली, कोण जाणे वडलांना "Art Of Living"च्या शिबीराविषयी कोणी सागितले,मला बळजबरिनॆ शिबीराला पाठवन्यांत आलं, पण काही म्हणा वडलांनी माझ्यासाठी घेतलेली ती डिंसिंजन मला नंतर आवडली,(कारण त्या शिबीरात खुप मस्त पोरी होत्या रावं, ते ५ दिवस कसे गेले समंजलं पण नाही) त्या शिबीराचा मला कीती फ़ायदा झाला माहीत नाही पण माझे आई-वडील दोघांना माझ्यात खुप बदल वाटला त्यांनतर, result आला पास झालो, इंजिंनिअरिगला प्रवेश घेतला.
१ले वर्ष शांतपणे गेलं, result आला मस्त पास झालो, सर्व विषय निघाले , All Clear , हुशारचा शिक्का कपाळावर बसला.आई-वडील दोघे खुश होते(त्याना वाटल पोरग सुधारल शिबीरामुळं) पण आपल तर मन लागत नव्हतं राव कस आहे अस शांत बसणं आपल्या रक्तात नाही. २ रे वर्ष चालु झाले आणि खरी कॉलेज लाईफ़ चालु झाली, असाचं एक प्रसंग १ महिंन्यापुर्वी घडला, क्लासमध्ये मी comment पास केली आणि पकड्ल्या गेलो, आणि थेट HOD सरांची कॅबिन मला शेवटची Warning देण्यात आली, जेव्हा मी सरांचे बोलणे खात होतो,तेव्हा मला वाटत होत "स्वभावाला खरच औषध नसतं का?"आणि मला माझ्या ११वी,१२वी चे दीवस आठवले आणि ते "Art Of Living" च शिबीरपणं.
तुम्हाला काय वाटतं "स्वभावाला खरचं औषध का?",असेल तर ते कोणत्या मेंडिकलमधे भेटत? ,खरचं आपण आपला स्वभाव बदलु शकत नाही का? आपल्या प्रतिक्रिया जरुर कळ्वा मी वाट पाहतो आहे.
॥ जय महाराष्ट्र ॥

Saturday, March 6, 2010

अभ्यास कशाला?

जितका आम्ही अभ्यास जास्त करतो तितके आम्ही जास्त जाणतो.जितके आम्ही जास्त जाणतो तितके आम्ही जास्त विसरतो. जितके आम्ही जास्त विसरतो तितके आम्ही कमी जाणतो.आम्ही जितके कमी जाणतो तितके आम्ही कमी विसरतो.जितके आम्ही कमी वासरतो तितके आम्ही जास्त जाणतो. मग अभ्यासाची गरजच काय?

Sunday, February 21, 2010

खर्‍या समस्या...

बरेच दिवस झाले , मी विचार करत होतो, सद्ध्या महाराष्ट्राच्या खऱ्या समस्या काय आहेत ...
एक छोटी लिस्ट बनवली आहे ...


महाराष्ट्राच्या खर्‍या समस्या...
१. परप्रांतीय/ .हिंदी विरुद्ध मराठी भाषा.
२. शाहरुख खान, माई नेम ईज़ खान .आणि त्या साठी दिलेली सुरक्षा.
३. सत्य साई बाबा त्यांची मुख्यमंत्र्यांनी केलेली पूजा ...!
४. मनसे विरुद्ध शिवसेना विरुद्ध थोड्याफार प्रमाणात कॉंग्रेस विरुद्ध राष्ट्रवादी
५. राज विरुद्ध अमिताभ विरुद्ध अबु आजमी : उद्धव विरुद्ध राहुल गांधी.


लिस्ट खूप मोठी आहे हो ...


माझ्या मते...सामान्य माणसाचे प्रश्न हे सामान्य माणसाचेच आणि सामान्य माणसासाठीच असतात.
आणि ती काय सामान्य माणसे आहेत का ???


लोक पण उगाच अपेक्षा ठेवतात त्यांच्या कडून.


लोकसंख्या वाढ, रस्ते, शिक्षण, शेतकऱ्याचा आत्महत्या, प्रदूषण, पाणी पुरवठा..


यासगळ्या समस्या


मध्य मुंबई मध्ये,
ए सी बंगल्यात बसून,
५ स्टार हॉटेल मध्ये सभा घेऊन,
५०-६० पोलिसांच्या सुरक्षा कवचातून,
२५-३० लाखाच्या गाडीतून
थोडीच कळणार राव ???

Thursday, January 14, 2010

हे प्रेम की आकर्षण ?

नमस्कार मित्रांनो मी नव्यानेच सहभागी झालोय इथे. तर मी तुम्हाला माझ्या मनात बऱ्याच दिवसापासून चाललेल्या घालमेलीबद्दल सांगणार आहे. आज मी सर्व काही जे माझ्या मानात दाबून धरलेल्या भावना तुमच्यासमोर सांगणार आहे. कृपा करून मी काही चुकलोय का हे आपण मला सांगाल?

सुरुवातीपासून सांगतो, तसा मी मध्यम वर्गीय कुटुंबातील च आहे. मी औरंगाबादला राहतो. चांगले शिकून एखादी नोकरी मिळवावी हे सर्व मध्यम वर्गीय मुलां प्रमाणे माझेही स्वप्ना. त्यासाठी मेहनत करणारा अनेकां पैकी मी हि एक. माझे एक ठाम मत होते अगदी शाळेत असल्या पासून. प्रेम म्हणजे आपल्या करिअर मधील स्पीड ब्रेकर चुकून हि ह्या भानगडीत पडायचे नाही असाच माझा अजेंडा( आज हि काही प्रमाणात आहेच). त्या मुले मी कधी हि कुण्या हि मुलीशी आपण होऊन बोललेलो नाही मैत्री करण्याचा विचार तर दूर च. आणि प्रेम तर कोसो दूर.. आणि हो प्रेमा पायी?. करिअर चे वाटोळे झालेली माझेच काही मित्र माझ्या समोर च आहेत त्या मुळे तर निर्धार पक्का झाला. अशी हि विचार सारणी होती. पण मात्र दै लोकमत च्या ऑक्सिजन पुरवणी मधील प्रेमाचे अंक वाचायचो. वाचून बऱ्याच गोष्टींचे समाधान झाले. काही वेळा प्रेमावरील अंकांची मी टिंगल हि फार करायचो. काही गोष्टी पटायच्या हि.. प्रेमा वरून माझा मित्रांत आणि माझ्यात फार वाद व्हायचे मी एकटाच आमच्या ग्रुप मध्ये प्रेमाच्या विरोधात. माझा निर्धार पक्का होता. प्रेमात पडायचे नाही. मुलींशी होऊन बोलायचे नाही. पण मनाने आपले काम दाखवलेच. करिअर, ध्येय मनाला ह्याचे कधी हि देणे घेणे नसते. मना ला फक्त प्रतिसाद देण्याचे काम चोख पणे असते. कुठल्याही परिणामांचा विचार न करता. आणि त्याने ते बजावलेच. अगदी चोखपणे, अनाहूतपणे

त्याचे असे झाले प्रथम वर्ष सुरू झाले. मी कॉलेजला सहसा रिक्शाने जायचो. पण एका दिवशी म्हटले चला बस जाऊया. बस चा स्टॉप. आमच्या इथून सुरू होतो. त्यामुळे बसलो. त्या वेळी ती बस मध्ये चढली. तेवा सहज लक्ष्य गेले. इथे प्रथम नजरानजर झाली. म्हटला चला असेल कोणी किंवा योगायोग म्हणून दुर्लक्ष केले. तो ऑगस्ट चा महिना होता. नंतर नंतर मात्र त्या आठवड्यात बऱ्याच वेळा अशी नजरानजर झाली. पण मी काही नजर मिळविण्याचा प्रयत्न केला नाही. म्हटला योगायोग किंवा असेच पहिले असेल. मात्र अशी नजरानजर मात्र पुढे बऱ्याच वेळा होऊ लागली. ती पॉलीटेक ला शिकायला तिच्या मामा कडे आली होती. तिचे मामा आमच्या बऱ्या पैकी ओळखीचे होते. त्यांचे घर कॉलेजला जाताना रस्त्यातच होते. ( त्यांच्या घरी हि कधी जायचो नाही कारण त्यांच्या हि तीन मुली होत्या). त्यामुळे नजरानजर व्हायची मी मात्र ठाम. नजर मिळवू द्यायची नाही
मी आणि माझा मित्र बरेचदा संध्याकाळी आमच्या कॉलनीच्या कॉर्नर वर बोलत उभे असायचो. हा आमचा दररोजचा नित्यनियम. पण त्यावेळी ती हि तिच्या मैत्रिणी कडून दररोज येऊ; आगळी. यायची तेवा हि ती बघायची. त्या ऑगस्ट आणि सप्टेंबर ह्या दोन महिन्यात अशी बरेचदा नजरानजर झाली. तिने नजर मिळवली कि मी लगेच दुसरीकडे पाहायचो. हा आता हे सांगू शकत नाही कि ती सहज लक्ष्य गेले म्हणून पाहायची कि मुद्दामहून. पण मी ठाम होतो माझ्या निश्चयावर. मुलींशी बोलायचे नही नही म्हणजे नाही पण.. का कोण जाणे त्या महिन्यात मात्र मला तिच्या विषयी एका प्रसंगाने विचार करायला भाग पडले. त्या दिवशी असे झाले कि मला कॉलेजला लवकर जायचे असल्याने लवकर निघालो आणि मी बस मध्ये बसलो. पण उशीर होईल म्हणून मी एका रिक्षा वाल्याला थांबवले. आणि रिक्शात बसलो. आश्चर्याची गोष्ट म्हणजे आमची रिक्षा जायला लागली असताना तिने हि त्यास थांबवले आणि ती हि त्या रिक्शात बसली. मला थोडा धक्का च बसला. पण म्हटले चला "योगायोग". आणि साहजिकच मी संपूर्ण रस्ता भर तिच्याशी बोललो नाही. पण मला त्या दिवशी काय झाले काही कळले नाही. तिच्या बाबत थोडा तरी विचार माझ्या मनात आला... त्यानंतर का कोण जाणे पण माझी हि नजर तिच्या कडे वाळू लागली. मी तिला पाहताच ती नजर चोरायची. ती मला पाहताच मी नजर चोरायचो. कधी प्रेमाचा विचार हि यायचा. पण वाटायचे हा काय सिनेमा आहे नजर नजरेत प्रेम व्हायला त्यात माझे माझे तत्त्व मुलींशी न बोलण्याचे पक्के. आणि त्यात मित्रात अगोदरच प्रसिद्ध प्रेम विरोधक म्हणून. ती प्रतिमा जपावी म्हणून माझ्या मित्रांकडे हि काही बोललो नाही. तर अशी हि नजरानजर वर्षभर चालू होती. हळू हळू माझे मन तिच्या बद्दल विचार करायला लागले होते. ह्यात परीक्षा आल्या आणि संपल्या आणि सुट्ट्या लागल्या उन्हाळ्याच्या. त्यामुळे ती तिच्या गावाला गेल्याने ती दिसूच नाही लागली आणि इथेच मनाने काम बजावले....
ती दिसावी म्हणून मी बऱ्याच वेळा तिच्या घराकडे बघू लागलो पण पण ती दिसत नव्हती. त्या दीड महिन्यात बऱ्याच वेळा तिच्या घरासमोरून जाऊ लागलो. मला काय होऊ लागले माझे मला समजू नाही लागले. त्यात मध्येच तत्त्व जागे व्हायचे हे तुझा काम नाही. पण... नेमके काय होतं काहीच उमजत नव्हते. बहुतेक यालाच प्रेम म्हणत तर नसावे?. आणि..... तब्बल दीड महिन्यांनी ती तिच्या टिपीकल पॉलीटेक च्या ड्रेस मध्ये दिसली. जेवा दिसली तेवा जणू काही फार मोठी गोष्ट हरवते आणि मग सापडते तेवा जो आनंद होईल तो आनंद झाला. तिला पाहताच काळजात अगदी धस्स झाले. श्वासांची गती वाढली डोळे विस्फारले. असे माझ्या बाबतीत कधीच नव्हते घडले. तुम्हाला सांगतो त्या दिवसा पासून मात्र ती जेवा पाहायची तेवा माझ्या काळजात धस्स व्हायचे. तिची नजर मला प्रत्येक वेळी घायाळ करत होती अगदी हृदयात खोलपर्यंत. शेवटी मी प्रेमात पडलोय या निष्कर्ष पर्यंत मी आलो होतो. तिचं माझ्यावर प्रेम असेल काही माहीत नाही माझा मात्र तिच्यावर खरंच जीव जडला होता.
नेमके ह्याच दरम्यान दै लोकमतच्या त्या पुरवणीत प्रेमा वरचा अंक माझ्या वाचनात आला. त्यात लिहिलेले होते कि प्रेम कि आकर्षण हे तपासून पाहा. आकर्षण असेलतर ते काही दिवसात कमी होईल आणि प्रेम असेल तर टिकेल. म्हटला चला आपल्याला प्रेम आहे कि आकर्षण ते तपासून पाहावे, आणि इथेच सगळा घोळ झाला. तो महिना होता जून 2008 चा. नंतर माझे दुसरे वर्ष सुरू झाले. तेवा मी मला प्रेम आहे कि नाही हे तपासून पाहू लागलो. मध्येच प्रेमात न पडण्याचे तत्त्व जागे व्हायचे. पण तिचा विचार मात्र काही मनात तून जात नव्हता. नंतर नंतर तर तर जेवढा तिचं विचार न आणायचा ठरवायचो तितका तिचं विचार जास्त यायचा. तुम्हाला सांगतो त्या मागच्या सहा महिन्यात मात्र मी एवढा तळमळत होतो, रात्री २ वाजायचे झोपायला. उठता बसता तिचीच आठवण. त्यात पॉलिटेकचा चा ड्रेस घातलेली मुलगी दिसली कि ती असल्याचा भास व्हायचा. तिच्या घरापासून जाताना ती मला पाहत असल्याचा भास व्हायचा. या दरम्यान तिचे दिसणे फार कमी झाले. म्हणजे माझा आणि तिचा टायमिंग वेगळा झाला कॉलेजला जायचा. पण तरीही संध्या काळी हि ती कमी दिसायची. त्यात मला सुरसुरी प्रेम कि आकर्षण ठरविण्याची त्यामुळे कधी तरी दिसली तरी कधी तत्त्व तर कधी तो प्रेमाचा अंक आठवायचा. ह्यात मात्र मी तिच्यात अगदी अडकलोय मला हे काळात नव्हते. ह्यात जानेवारीचा महिना उजाडला. ह्या सहा महिन्यात ती फक्त १० ते १५ वेळा दिसली असेल. पण जेवा दिसली तेवा एकतर मी तरी नजर चुकवायचो नाहीतर ती तरी नजर चुकवायची. त्यानंतर एकदा पुन्हा एकदा आणि शेवटचे तिच्या सोबत पुन्हा रिक्शात बसण्याचा योग आला. पण ह्यावेळी मात्र मी स्वतःहून ती ज्या रिक्शात बसलो पण बोलणे ह्या हि वेळी झाले नाही. ह्या नंतर मात्र ती कधी दिसलीच नाही.. पण जानेवारी पासून ती दिसलीच नाही

नंतर शेवटचे दिसली ती जून 2009 च्या 18 तारखेला( हे नंतर कळले कि ती त्या दिवशी चालली आहे तो तिचा शेवटचा दिवस होता औरंगाबाद मधला. )त्या वेळी मात्र मी धाडस करून तिच्या डोळ्यात डोळे घालून पहिले तिने हि पहिले. ह्या वेळी न तिने नजर चुकविली न मी. पण जणू ती नजरेने जणू सांगत होती आता फार उशीर झाला रे हे पहिलेच पाहायला हवे होते. हे धाडस आधीचा करायला हवे होते. आता शक्य नाही. निदान मला तरी तसे जाणवले. कारण तिचं तो शेवटचा दिवस होता औरंगाबाद चा ह्या नंतर ती आपल्या शहरात परळी ला निघून गेली. मला मात्र हे माहीत नव्हते कि ती गेलीय म्हणून. माझी मात्र अवस्था सेम. कधीतरी दिसेल हि आशा. एव्हढे सगळे माझ्या मनात चालू होते तत्त्व, ती आणि प्रेमावरील त्या पुरवणीचे तत्त्व ह्या चक्रात काय करावे हे ठरवू शकत नव्हतो. त्यातल्या त्यात मी माझ्या एका हि मित्राला सांगितले नाही. कारण मी हरणार होतो सांगितले तर पण मात्र आता सहन होत नव्हते माझ्या २ मित्रांना धाडस करून सांगितले सप्टेंबर महिन्यात. सांगताना अगदी माझे ओठ थरथर होते बोलत होतो पण भान नव्हते मनात दाबून ठेवलेला सगळं बाहेर येताना, सांगताना वेगळेच वाटत होते. ह्याचवेळी मित्रांचे महत्त्वही मला आणखी कळले कारण त्यांची प्रतिक्रिया हे ऐकल्यावर पहिली हीच होती, तू हरला नाही तर जिंकलास. आणि त्यातल्या एक मित्रानेच सांगितले कि ती हे सोडून गेली आहे परळीला. कायमची. तिची बदली करून घेतली तिच्या वडिलांनी आता बोला....
मी आता काय करू. माझे काही प्रश्न आहेत आपल्याला.

प्रेम कि आकर्षण हे ठरविण्याचा कालावधी नेमका किती?
नेमके मला प्रेमच होते का?
नेमके माझे काही चुकले का? असेल तर कुठे?
तिचे हि प्रेम असेल का माझ्या वर कि नुसताच योगायोग?
मी बरोबर होतो का?

कारण अजून हि माझ्या भावना तेवढ्याच आहेत. आता तर काय सांगू माझी हालत शब्दात सांगणे कठीण पण... आता काहीही अर्थ नाही. पण मी काय करू तिची आठवण काही जात नाही मनातून. बेचैन होतो निराश नाही. किती नाही म्हटले किती हि नाही ठरविले तरी ती आठवतेच. तिला विसरावे म्हणून आता इतर मुलींशी बोलायला हि लागलोय पण तिची जागा कोणीच जागा घेत नाही. कारण इथे प्रेम कि आकर्षण हे सूत्र कामी पडलते. एक दोघी बऱ्या वाटल्या पण फक्त काही दिवस. नंतर काही हि नाही. पण तिची आठवण अजून ना कमी होते ना तिचं चेहरा. मी तिला विसरण्या साठी काय करू.
ह्या सगळ्या दरम्यान अजून एक सांगू. ह्या तीन वर्षात मला तिचे नाव हि माहीत नव्हते. शपथ खोटे नाही सांगत, तेही मित्र न्कडून माहीत झाले. आणि अगदी योग्य नाव होते तिचे "भाग्यशाली" पण मी मात्र अभागी ठरलो समजलो नाही अजून हि नाही कि, हे प्रेम कि आकर्षण?