"First they ignore you, then they laugh at you, then they fight you, then you win." - Mahatma Gandhi"

Thursday, March 25, 2010

खरचं स्वभावाला औषध नसतं का?

आपल्या मराठीत एक म्हण आहे कि, "स्वभावाला औषध नसतं" म्हणजे आपण कितीही प्रयन्य केला तरी स्वभाव बदलू शकत नाही, याची प्रचिती आपल्याला स्व:त किवा मिंत्राच्या रुपात येत असते. माझाच उदाहरण घ्या ना राव, माझा स्वभाव तसा खोडकर, १०वी पर्यत एकही दीवस असा गेला नाही की,घरी माझ्यामुळे भाडणं आलं नाही, रोज कोणाच्या तरी घराच्यां काचा चेंडुने फ़ॊंडणार नाहीतर दूसरे काही, रॊजचा नियमचं बनला होता.
१०वी झाली,मस्त मार्काने पास झालो,आता कॉलेज म्हणजे आपल्याला सारं रान आपल्याला मोकळं असं मला वाटायचं ,मी औरंगाबादच्या शिंवछत्रपती महाविद्यालयात प्रवेश घेतला, मग काय रोज मित्राबरोबर "कॅनॉट प्लेसला" Party आठवड्याला पीव्हीआरला एक पींचर, आणि दर महिन्याला कॉलेजमध्ये भाडणं आणि ती principalची कॅबिन ठरलेलं वेळापत्रक, काय सांगू कीती मजा यायची राव, आजही ते दिवस मी मिस करतो . १२वी ला आलो घरच्यानां वाटलं आता पोरगं सुधरेलं पण कशाचे काय यावेळी तर , मी सिमांच ओलाडंली , Bioच्या सरांनाच direct धमकी दीली , नंतर मॅटर दाबण्याचा आम्ही खुप प्रयन्य केला पण काहीही उपयोग झाला नाही, परत principalची कॅबिन पण यावेळी principalने माझ्या वडलांना बोलावल,आणि माझं अ‍ॅडमिशन रद्द करन्यांची धमकी दीली .मला त्या principalचा रागचं आला पण काय करणार, मनात म्हणलं बाहेर ये मग सांगतो आणि मी राग आवरला,काय सागूं आतापर्यत वाटत होतं,"आपण मराठे म्हणजे दूसरे वाघचं आणि येथ..............सोडा कूठे शिव्या देता राव."
१२वीची exam झाली, कोण जाणे वडलांना "Art Of Living"च्या शिबीराविषयी कोणी सागितले,मला बळजबरिनॆ शिबीराला पाठवन्यांत आलं, पण काही म्हणा वडलांनी माझ्यासाठी घेतलेली ती डिंसिंजन मला नंतर आवडली,(कारण त्या शिबीरात खुप मस्त पोरी होत्या रावं, ते ५ दिवस कसे गेले समंजलं पण नाही) त्या शिबीराचा मला कीती फ़ायदा झाला माहीत नाही पण माझे आई-वडील दोघांना माझ्यात खुप बदल वाटला त्यांनतर, result आला पास झालो, इंजिंनिअरिगला प्रवेश घेतला.
१ले वर्ष शांतपणे गेलं, result आला मस्त पास झालो, सर्व विषय निघाले , All Clear , हुशारचा शिक्का कपाळावर बसला.आई-वडील दोघे खुश होते(त्याना वाटल पोरग सुधारल शिबीरामुळं) पण आपल तर मन लागत नव्हतं राव कस आहे अस शांत बसणं आपल्या रक्तात नाही. २ रे वर्ष चालु झाले आणि खरी कॉलेज लाईफ़ चालु झाली, असाचं एक प्रसंग १ महिंन्यापुर्वी घडला, क्लासमध्ये मी comment पास केली आणि पकड्ल्या गेलो, आणि थेट HOD सरांची कॅबिन मला शेवटची Warning देण्यात आली, जेव्हा मी सरांचे बोलणे खात होतो,तेव्हा मला वाटत होत "स्वभावाला खरच औषध नसतं का?"आणि मला माझ्या ११वी,१२वी चे दीवस आठवले आणि ते "Art Of Living" च शिबीरपणं.
तुम्हाला काय वाटतं "स्वभावाला खरचं औषध का?",असेल तर ते कोणत्या मेंडिकलमधे भेटत? ,खरचं आपण आपला स्वभाव बदलु शकत नाही का? आपल्या प्रतिक्रिया जरुर कळ्वा मी वाट पाहतो आहे.
॥ जय महाराष्ट्र ॥

4 comments:

  1. दिलीप खडसेMarch 26, 2010 at 12:13 AM

    स्वभाव बदलने ही..
    एक अवघड गोस्ट आहे.....
    कारण आपल्याला त्याची सवय झालेली असते....
    आणि परत बदलल्या नंतर मित्रांच्या comment आहेतच की..
    ते पचवण्याची क्षमता?????
    दिलीप..

    ReplyDelete
  2. आणि हो आपन इंजीनियर बननार आहोत...
    नाहीतर स्वभावासाठी औषध नक्की बनवले असते...
    दिलीप..

    ReplyDelete
  3. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  4. खरतर स्वभाव हा मानसाच्या व्यक्तिमत्वाशी निगडीत असतो. तो बदलने अवघड असते, जरी अशक्य नसले. काही वेळा एखादी घटना माणसाचा स्वभाव पुर्णपणे बदलुन टाकते; तर काही वेळा जबाबदारी आणि वय.

    ReplyDelete