"First they ignore you, then they laugh at you, then they fight you, then you win." - Mahatma Gandhi"

Thursday, January 14, 2010

हे प्रेम की आकर्षण ?

नमस्कार मित्रांनो मी नव्यानेच सहभागी झालोय इथे. तर मी तुम्हाला माझ्या मनात बऱ्याच दिवसापासून चाललेल्या घालमेलीबद्दल सांगणार आहे. आज मी सर्व काही जे माझ्या मानात दाबून धरलेल्या भावना तुमच्यासमोर सांगणार आहे. कृपा करून मी काही चुकलोय का हे आपण मला सांगाल?

सुरुवातीपासून सांगतो, तसा मी मध्यम वर्गीय कुटुंबातील च आहे. मी औरंगाबादला राहतो. चांगले शिकून एखादी नोकरी मिळवावी हे सर्व मध्यम वर्गीय मुलां प्रमाणे माझेही स्वप्ना. त्यासाठी मेहनत करणारा अनेकां पैकी मी हि एक. माझे एक ठाम मत होते अगदी शाळेत असल्या पासून. प्रेम म्हणजे आपल्या करिअर मधील स्पीड ब्रेकर चुकून हि ह्या भानगडीत पडायचे नाही असाच माझा अजेंडा( आज हि काही प्रमाणात आहेच). त्या मुले मी कधी हि कुण्या हि मुलीशी आपण होऊन बोललेलो नाही मैत्री करण्याचा विचार तर दूर च. आणि प्रेम तर कोसो दूर.. आणि हो प्रेमा पायी?. करिअर चे वाटोळे झालेली माझेच काही मित्र माझ्या समोर च आहेत त्या मुळे तर निर्धार पक्का झाला. अशी हि विचार सारणी होती. पण मात्र दै लोकमत च्या ऑक्सिजन पुरवणी मधील प्रेमाचे अंक वाचायचो. वाचून बऱ्याच गोष्टींचे समाधान झाले. काही वेळा प्रेमावरील अंकांची मी टिंगल हि फार करायचो. काही गोष्टी पटायच्या हि.. प्रेमा वरून माझा मित्रांत आणि माझ्यात फार वाद व्हायचे मी एकटाच आमच्या ग्रुप मध्ये प्रेमाच्या विरोधात. माझा निर्धार पक्का होता. प्रेमात पडायचे नाही. मुलींशी होऊन बोलायचे नाही. पण मनाने आपले काम दाखवलेच. करिअर, ध्येय मनाला ह्याचे कधी हि देणे घेणे नसते. मना ला फक्त प्रतिसाद देण्याचे काम चोख पणे असते. कुठल्याही परिणामांचा विचार न करता. आणि त्याने ते बजावलेच. अगदी चोखपणे, अनाहूतपणे

त्याचे असे झाले प्रथम वर्ष सुरू झाले. मी कॉलेजला सहसा रिक्शाने जायचो. पण एका दिवशी म्हटले चला बस जाऊया. बस चा स्टॉप. आमच्या इथून सुरू होतो. त्यामुळे बसलो. त्या वेळी ती बस मध्ये चढली. तेवा सहज लक्ष्य गेले. इथे प्रथम नजरानजर झाली. म्हटला चला असेल कोणी किंवा योगायोग म्हणून दुर्लक्ष केले. तो ऑगस्ट चा महिना होता. नंतर नंतर मात्र त्या आठवड्यात बऱ्याच वेळा अशी नजरानजर झाली. पण मी काही नजर मिळविण्याचा प्रयत्न केला नाही. म्हटला योगायोग किंवा असेच पहिले असेल. मात्र अशी नजरानजर मात्र पुढे बऱ्याच वेळा होऊ लागली. ती पॉलीटेक ला शिकायला तिच्या मामा कडे आली होती. तिचे मामा आमच्या बऱ्या पैकी ओळखीचे होते. त्यांचे घर कॉलेजला जाताना रस्त्यातच होते. ( त्यांच्या घरी हि कधी जायचो नाही कारण त्यांच्या हि तीन मुली होत्या). त्यामुळे नजरानजर व्हायची मी मात्र ठाम. नजर मिळवू द्यायची नाही
मी आणि माझा मित्र बरेचदा संध्याकाळी आमच्या कॉलनीच्या कॉर्नर वर बोलत उभे असायचो. हा आमचा दररोजचा नित्यनियम. पण त्यावेळी ती हि तिच्या मैत्रिणी कडून दररोज येऊ; आगळी. यायची तेवा हि ती बघायची. त्या ऑगस्ट आणि सप्टेंबर ह्या दोन महिन्यात अशी बरेचदा नजरानजर झाली. तिने नजर मिळवली कि मी लगेच दुसरीकडे पाहायचो. हा आता हे सांगू शकत नाही कि ती सहज लक्ष्य गेले म्हणून पाहायची कि मुद्दामहून. पण मी ठाम होतो माझ्या निश्चयावर. मुलींशी बोलायचे नही नही म्हणजे नाही पण.. का कोण जाणे त्या महिन्यात मात्र मला तिच्या विषयी एका प्रसंगाने विचार करायला भाग पडले. त्या दिवशी असे झाले कि मला कॉलेजला लवकर जायचे असल्याने लवकर निघालो आणि मी बस मध्ये बसलो. पण उशीर होईल म्हणून मी एका रिक्षा वाल्याला थांबवले. आणि रिक्शात बसलो. आश्चर्याची गोष्ट म्हणजे आमची रिक्षा जायला लागली असताना तिने हि त्यास थांबवले आणि ती हि त्या रिक्शात बसली. मला थोडा धक्का च बसला. पण म्हटले चला "योगायोग". आणि साहजिकच मी संपूर्ण रस्ता भर तिच्याशी बोललो नाही. पण मला त्या दिवशी काय झाले काही कळले नाही. तिच्या बाबत थोडा तरी विचार माझ्या मनात आला... त्यानंतर का कोण जाणे पण माझी हि नजर तिच्या कडे वाळू लागली. मी तिला पाहताच ती नजर चोरायची. ती मला पाहताच मी नजर चोरायचो. कधी प्रेमाचा विचार हि यायचा. पण वाटायचे हा काय सिनेमा आहे नजर नजरेत प्रेम व्हायला त्यात माझे माझे तत्त्व मुलींशी न बोलण्याचे पक्के. आणि त्यात मित्रात अगोदरच प्रसिद्ध प्रेम विरोधक म्हणून. ती प्रतिमा जपावी म्हणून माझ्या मित्रांकडे हि काही बोललो नाही. तर अशी हि नजरानजर वर्षभर चालू होती. हळू हळू माझे मन तिच्या बद्दल विचार करायला लागले होते. ह्यात परीक्षा आल्या आणि संपल्या आणि सुट्ट्या लागल्या उन्हाळ्याच्या. त्यामुळे ती तिच्या गावाला गेल्याने ती दिसूच नाही लागली आणि इथेच मनाने काम बजावले....
ती दिसावी म्हणून मी बऱ्याच वेळा तिच्या घराकडे बघू लागलो पण पण ती दिसत नव्हती. त्या दीड महिन्यात बऱ्याच वेळा तिच्या घरासमोरून जाऊ लागलो. मला काय होऊ लागले माझे मला समजू नाही लागले. त्यात मध्येच तत्त्व जागे व्हायचे हे तुझा काम नाही. पण... नेमके काय होतं काहीच उमजत नव्हते. बहुतेक यालाच प्रेम म्हणत तर नसावे?. आणि..... तब्बल दीड महिन्यांनी ती तिच्या टिपीकल पॉलीटेक च्या ड्रेस मध्ये दिसली. जेवा दिसली तेवा जणू काही फार मोठी गोष्ट हरवते आणि मग सापडते तेवा जो आनंद होईल तो आनंद झाला. तिला पाहताच काळजात अगदी धस्स झाले. श्वासांची गती वाढली डोळे विस्फारले. असे माझ्या बाबतीत कधीच नव्हते घडले. तुम्हाला सांगतो त्या दिवसा पासून मात्र ती जेवा पाहायची तेवा माझ्या काळजात धस्स व्हायचे. तिची नजर मला प्रत्येक वेळी घायाळ करत होती अगदी हृदयात खोलपर्यंत. शेवटी मी प्रेमात पडलोय या निष्कर्ष पर्यंत मी आलो होतो. तिचं माझ्यावर प्रेम असेल काही माहीत नाही माझा मात्र तिच्यावर खरंच जीव जडला होता.
नेमके ह्याच दरम्यान दै लोकमतच्या त्या पुरवणीत प्रेमा वरचा अंक माझ्या वाचनात आला. त्यात लिहिलेले होते कि प्रेम कि आकर्षण हे तपासून पाहा. आकर्षण असेलतर ते काही दिवसात कमी होईल आणि प्रेम असेल तर टिकेल. म्हटला चला आपल्याला प्रेम आहे कि आकर्षण ते तपासून पाहावे, आणि इथेच सगळा घोळ झाला. तो महिना होता जून 2008 चा. नंतर माझे दुसरे वर्ष सुरू झाले. तेवा मी मला प्रेम आहे कि नाही हे तपासून पाहू लागलो. मध्येच प्रेमात न पडण्याचे तत्त्व जागे व्हायचे. पण तिचा विचार मात्र काही मनात तून जात नव्हता. नंतर नंतर तर तर जेवढा तिचं विचार न आणायचा ठरवायचो तितका तिचं विचार जास्त यायचा. तुम्हाला सांगतो त्या मागच्या सहा महिन्यात मात्र मी एवढा तळमळत होतो, रात्री २ वाजायचे झोपायला. उठता बसता तिचीच आठवण. त्यात पॉलिटेकचा चा ड्रेस घातलेली मुलगी दिसली कि ती असल्याचा भास व्हायचा. तिच्या घरापासून जाताना ती मला पाहत असल्याचा भास व्हायचा. या दरम्यान तिचे दिसणे फार कमी झाले. म्हणजे माझा आणि तिचा टायमिंग वेगळा झाला कॉलेजला जायचा. पण तरीही संध्या काळी हि ती कमी दिसायची. त्यात मला सुरसुरी प्रेम कि आकर्षण ठरविण्याची त्यामुळे कधी तरी दिसली तरी कधी तत्त्व तर कधी तो प्रेमाचा अंक आठवायचा. ह्यात मात्र मी तिच्यात अगदी अडकलोय मला हे काळात नव्हते. ह्यात जानेवारीचा महिना उजाडला. ह्या सहा महिन्यात ती फक्त १० ते १५ वेळा दिसली असेल. पण जेवा दिसली तेवा एकतर मी तरी नजर चुकवायचो नाहीतर ती तरी नजर चुकवायची. त्यानंतर एकदा पुन्हा एकदा आणि शेवटचे तिच्या सोबत पुन्हा रिक्शात बसण्याचा योग आला. पण ह्यावेळी मात्र मी स्वतःहून ती ज्या रिक्शात बसलो पण बोलणे ह्या हि वेळी झाले नाही. ह्या नंतर मात्र ती कधी दिसलीच नाही.. पण जानेवारी पासून ती दिसलीच नाही

नंतर शेवटचे दिसली ती जून 2009 च्या 18 तारखेला( हे नंतर कळले कि ती त्या दिवशी चालली आहे तो तिचा शेवटचा दिवस होता औरंगाबाद मधला. )त्या वेळी मात्र मी धाडस करून तिच्या डोळ्यात डोळे घालून पहिले तिने हि पहिले. ह्या वेळी न तिने नजर चुकविली न मी. पण जणू ती नजरेने जणू सांगत होती आता फार उशीर झाला रे हे पहिलेच पाहायला हवे होते. हे धाडस आधीचा करायला हवे होते. आता शक्य नाही. निदान मला तरी तसे जाणवले. कारण तिचं तो शेवटचा दिवस होता औरंगाबाद चा ह्या नंतर ती आपल्या शहरात परळी ला निघून गेली. मला मात्र हे माहीत नव्हते कि ती गेलीय म्हणून. माझी मात्र अवस्था सेम. कधीतरी दिसेल हि आशा. एव्हढे सगळे माझ्या मनात चालू होते तत्त्व, ती आणि प्रेमावरील त्या पुरवणीचे तत्त्व ह्या चक्रात काय करावे हे ठरवू शकत नव्हतो. त्यातल्या त्यात मी माझ्या एका हि मित्राला सांगितले नाही. कारण मी हरणार होतो सांगितले तर पण मात्र आता सहन होत नव्हते माझ्या २ मित्रांना धाडस करून सांगितले सप्टेंबर महिन्यात. सांगताना अगदी माझे ओठ थरथर होते बोलत होतो पण भान नव्हते मनात दाबून ठेवलेला सगळं बाहेर येताना, सांगताना वेगळेच वाटत होते. ह्याचवेळी मित्रांचे महत्त्वही मला आणखी कळले कारण त्यांची प्रतिक्रिया हे ऐकल्यावर पहिली हीच होती, तू हरला नाही तर जिंकलास. आणि त्यातल्या एक मित्रानेच सांगितले कि ती हे सोडून गेली आहे परळीला. कायमची. तिची बदली करून घेतली तिच्या वडिलांनी आता बोला....
मी आता काय करू. माझे काही प्रश्न आहेत आपल्याला.

प्रेम कि आकर्षण हे ठरविण्याचा कालावधी नेमका किती?
नेमके मला प्रेमच होते का?
नेमके माझे काही चुकले का? असेल तर कुठे?
तिचे हि प्रेम असेल का माझ्या वर कि नुसताच योगायोग?
मी बरोबर होतो का?

कारण अजून हि माझ्या भावना तेवढ्याच आहेत. आता तर काय सांगू माझी हालत शब्दात सांगणे कठीण पण... आता काहीही अर्थ नाही. पण मी काय करू तिची आठवण काही जात नाही मनातून. बेचैन होतो निराश नाही. किती नाही म्हटले किती हि नाही ठरविले तरी ती आठवतेच. तिला विसरावे म्हणून आता इतर मुलींशी बोलायला हि लागलोय पण तिची जागा कोणीच जागा घेत नाही. कारण इथे प्रेम कि आकर्षण हे सूत्र कामी पडलते. एक दोघी बऱ्या वाटल्या पण फक्त काही दिवस. नंतर काही हि नाही. पण तिची आठवण अजून ना कमी होते ना तिचं चेहरा. मी तिला विसरण्या साठी काय करू.
ह्या सगळ्या दरम्यान अजून एक सांगू. ह्या तीन वर्षात मला तिचे नाव हि माहीत नव्हते. शपथ खोटे नाही सांगत, तेही मित्र न्कडून माहीत झाले. आणि अगदी योग्य नाव होते तिचे "भाग्यशाली" पण मी मात्र अभागी ठरलो समजलो नाही अजून हि नाही कि, हे प्रेम कि आकर्षण?

19 comments:

  1. बापरे, मला तर कधीच नाही सांगितलं तू "या" गोष्टीबद्दल... बाय दि वे, कळालं... त्यावेळी तू एवढा नर्व्हस का राहायचा ते...!

    एक सांगू का, ती गेली म्हणजे सगळं संपलं असं बिल्कूल नाहिये... हां त्यावेळी तू तिच्या प्रेमातच पडला होता, पण जे व्हायचे होते ते झाले. पुढचा विचार कर...

    पुढेही अनेक पोरी भेटतील, पण तू मात्र अशा गोष्टींपासून स्वतःच्या जीवाला जप...
    एन्जॉय एव्हरी मुमेन्ट ऑफ लाईफ...!

    - विशल्या!

    ReplyDelete
  2. मित्रा तुझे नाव माहिती नाही, असो

    अरे हे प्रेमच होते तुझे आणि तेही पहिले प्रेम

    जे माणूस आयुष्यात कधीही विसरू शकत नाही.

    ReplyDelete
  3. @ विक्रम दादा,
    धन्यवाद विक्रम दादा ,
    तुझी प्रतिक्रिया आवडली,माझे नाव कृष्णा घोडके आहे आणि
    मी औरंगाबादला राहतो .तु बरोबर आहे दादा पहीले प्रेम माणुस आयुश्यात कधीच विसरु शकत नाही.....
    असेच भेटत रहा.....

    ReplyDelete
  4. @ विशल्या,
    धन्यवाद , मित्रा तुझी प्रतिक्रिया आवडली,शेवटी "पहिला प्यार पहिला ही होता है" बरोबर ना.....
    असेच भेटत रहा

    ReplyDelete
  5. आपला ब्लॉग नवीनच दिसतोय. लेखनासाठी शुभेच्छा! ह्या लेखावरून वर वर नजर फिरवली आहे. पूर्ण वाचूनच अभिप्राय देईन. माझ्या ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद!

    ReplyDelete
  6. मित्रा विशाल म्हणतो तसं पुढे अनेक पोरी भेटतील देखील पण किती जणी बाबत तुला असे वाटेल हे कुणी नाही सांगू शकत. ह्या पुढे जेंव्हा पण कुणा मुलीबद्दल असे वाटेल तेंव्हा बिंदास बोलून टाक. जमलं तर ह्याचं मुलीला शोध. कारण प्रेम नेहमी नेहमी होतं नाही.

    ReplyDelete
  7. कृष्णा,
    मुलींशी नुसतं बोललं म्हणजे लगेच प्रेम होत नसतं. तुम्हांला जर एखाद्या व्यक्तीविषयी आकर्षण वाटत असेल, आणि तुम्ही त्या व्यक्तीशी संवाद साधलात तर तुम्हांला त्या व्यक्तीच्या तुमच्याविषयी असलेल्या नेमक्या भावनांचा अंदाज येतो.
    कोणास ठाऊक, कदाचित ती मुलगी एखाद्या सोशल वेबसाईटवर असेलही आणि कदाचित तुम्ही तिच्याकडे तुमच्या मनातल्या भावनाही व्यक्त करू शकाल. पण तुम्हांलाच तिच्याशी संवाद साधावा लागेल.
    मात्र एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा, जर तिने तुमच्या भावनांचा स्वीकार केला नाही, तर याचा अर्थ लगेच सगळं काही संपलंय असा होत नाही. कदाचित तिच्यापेक्षाही एखादी चांगली मुलगी तुमच्या नशिबात असेल. हा पुढचा विचार करणे अधिक महत्त्वाचे! तेव्हा नियतीच्या या परिक्षेला सकारात्मकपणे सामोरे जा.

    ReplyDelete
  8. कृष्णा,
    अरे प्रेम हे सगळ्यानां मिळत नसते,
    तुला प्रेम तर मिळाले होते .........
    परंतू तु त्याबद्दल तु ते तिला सांगू शकला नाहीस.

    आता ते जाऊ दे आणी पूढील प्रेम जे तुझी वात पाहात असेल
    त्याचा विचार कर.............
    त्यासाठी तुला माझ्या कडून शुभेच्छा.

    दिलीप.

    ReplyDelete
  9. @ DD ,
    पहीले प्रेम माणुस आयुश्यात कधीच विसरु शकत नाही.....
    तुझी प्रतिक्रिया आवडली,धन्यवाद

    ReplyDelete
  10. @सिद्धार्थ
    धन्यवाद,बरोबर आहे प्रेम नेहमी नेहमी होतं नाही.

    ReplyDelete
  11. कृष्णा, आत्ता तुझं मनोगत संपूर्ण वाचून काढलं. तुझ्या वयाची मुलं काय नि मुली काय ह्या वयात प्रपोज करताना घाबरतातच. त्यात तुझा दोष नाही पण जेव्हा आपल्याला समोरून प्रतिसाद मिळतो आहे, असं जरा जरी वाटलं, तरी आपण पुढाकार घ्यायला शिकावं. नाहीतर कोण आधी बोलणार यात बराच उशीर होतो.

    आता प्रॅक्टीकली सांगते. तुझं आयुष्य आत्ताच कुठे सुरू झालं आहे. तुझा अभ्यास, करियर याच्याकडे लक्ष दे. तुझ्या आयुष्यात तुला अनुरूप अशी जीवनसाथी नक्की मिळेल. प्रेम लग्नाआधीच होऊ शकतं असं नसतं पण लग्नाआधी होणा-या प्रेमात थ्रिल जरूर असतं. ते जर अनुभवायचं असेल, तर निराशा सोडून तुझं आयुष्य मनमुरादपणे जग. तुला कळणारही नाही अशा वळणावर तुझं प्रेम वाट पहात उभं असेल.

    पहिलं प्रेम हे विसरता येत नाही हे खरं असलं तरी पुन्हा प्रेमात तू पडणारच नाहीस, असं नाही काही. काळाचं औषध उत्तम औषध आहे.

    ReplyDelete
  12. सुन्दर पोस्ट आहे! अप्रतिम! खुपच रोम्यानटिक! प्रेम ही पूर्णपणे नैसर्गिक भावना आहे; त्यापासुन दुर कश्याला पळायाचे! आणि ते प्रेम आहे कि आकर्षन, याच्या विचारात न पडता ह्र्दयाचे ऎकून वागावे.

    ReplyDelete
  13. bhushan thakur
    are dada khare sangto kahi babatit ashich gost mazipan aahe mi sadhya s.y.bcom madhe shiktoy pan mi hi asech tuzyasarkha boto mulinpasun char pawale dur asayacho. 10 vi paryant aamchya class madhe mulich navhatya. pan 11th pasun commerce ghetalyane muli pan hotyach pan kadhi bolalo nahi. tasa mi abhyasat hushar hoto. account ya vishayat mala paiki chya paiki marks padayache mhanun mala aamchya class madhale changlech olkhat hote pan mala muli matra ek hi mahiti navhati. he mi shapath gheun sangu shakto. pan nantar f.y. madhe matra vegalech ghadle, aamhi envirnment chya project chya nimittane sare mirta elephanta la gelo hoto tyat mulihi aalya hotyach pan olakh naslyane mi kahi bolalo nahi. pan nantar kahi vegalech ghadle. kahi divasanantar tya mulinpaiki ekine mazyashi friendship karyachi aahe asa attahas dharala. aani kalantarane aamhi doghe mitra pan zalo. pan mala sarkhe tevha vatu lagale ki hi mazyavar kinva mi tari tichya premat padloy karan maitrichyahi aate aamche nate pudhe geley ase nidan mala tari vatat hote. pan nantar s.y.bcom madhe jyaveli aaalo tevha ek divas chukun ticha msg mala aala khare tar ti to msg tichya kakana pathavat hoti pan dararojchi savay mala msg pathavanyachi asyane to chukun malach aala tyamadhe tine lihile hote, "kaka mala maaf kara udya mi lambchya pravasala janar aahe. aani parat kadhich yenar nahi, aamchya family la sambhala." ha msg vachatach mazya hrudayachi dhaddhad chalu zali. aani mi kiti vajlet yache bhan n thevata tila call kela. ghari jane ashakya hote karan khup lamb ghar hote. aani tyatalya tyat aamchya gavachi yatra hoti. phone lavalyavar ti mhatali kahi nahi bhushan tu tension nako gheus sarvana madat karat ja. mi udya chalale, javala javal ek tasanatar ti udya mala bhetayala tayar zali, dusarya divashi mi jithe 12th che class gheto tithe ti aali aani sarv hakikat sangitali. khare tar ti gelya 7 varshanpasun ekavar prem karat hoti. pan to aata tayar navhata. agodar tohi prem karayacha pan aata tyache lagn karayache hote tyaveli matra to firala. aata tyache lagn zaley. aani mazya samajavinyamule tinehi kahi kel nahi. pan aajkaal sarkhi tichi kalaji vatate. aamach bolane ajunahi suru aahe. pan man ajun hi ghabartoy tila mhanayala. khar tar ha lekh mi kaal vachala hota pan aaj comment lihili. kaal mobile madhe balance navhata aani tila mazyashi bolayache hote mhanun tinech mazya mobile madhe balance kela. maze man hi sarkhe tikade lagun aste. aata he prem ki aakarshan malahi samjat nahi..........
    tumcha lekh kharokhar mazach vatala.
    sorry marathi font nasalyane english madhe lihayala lagale/

    ReplyDelete
  14. Mitra tila call kr ajun hi vel geli nsel ..
    Jr ti tuzya nasibat asel tr aaj hi bhetel ...

    ReplyDelete
  15. Mitra tila call kr ajun hi vel geli nsel ..
    Jr ti tuzya nasibat asel tr aaj hi bhetel ...

    ReplyDelete